Summary of the Book
अस्ताकडे जाणारा वाडा... पडझडीला आलेली भिंत... ढासळू पाहणारी चौकट... निखळलेला उंबरठा... भिंतीआड लपलेली काळीजदु:खं... नातेबंधाची चौकट धरू पाहत, ढळलेले तोल सावरीत उभी राहणारी माणसं लोभ-लालसा, इर्ष्या-असूया यात गुरफटणा-या माणसाच्या मनाची उलघाल, घुसमट यांचा प्रवास. सुनसान टेकड्या आणि हळूहळू या सर्वांवर होत असणारं शहरीकरणाचं आक्रमण या सर्व बदलता वास्तवाचे समर्थ दर्शन घडविणारे डॉ. राजेंद्र माने यांची नवी वाचनीय कादंबरी म्हणजे धाकटा वाडा.