Summary of the Book
यशस्वी होण्यासाठी काय करायचे, तर आपण यशस्वी आहोत, विजेते आहोत असाच विचार करा, असा सल्ला डॉ. वॉल्टर डॉयल स्टेपल्स यांनी दिला आहे. प्रा. पुष्पा ठक्कर यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. लोक कशामुळे यशस्वी होतात, याचा मागोवा ते प्रारंभी घेतात. जडणघडणीच्या काळात व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडतो, याची ओळख ते करून देतात.
मानवी वर्तनाचे प्रतिरूप, आकलनाची शक्ती, मानवी यश यंत्रणा, मन असे कार्य करते या प्रकरणामधून यशाकडे जाण्याच्या मार्गाची ओळख होते. भविष्याची योजना आखा, स्वतःवर मेहनत घ्या, स्वतःचे मोल वाढवा, असा सल्ला ते देतात. यशासाठी मानवी संबंध कसे उपयुक्त ठरतात, याची ओळख ते करून देतात. उत्पादकता वाढविण्याच्या युक्त्याही ते स्वतंत्र प्रकरणामधून सांगतात.