रंगनायिका ही कादंबरी मी वाचली आहे.
आमचे मिञ कॉम्रेड किशोर जाधव सर यांनी मला ही कादंबरी वाचण्यासाठी दिली होती. खास करून वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी दिली होती.
रंगनायिका या कादंबरी विषयी सांगायचे झाल्यास खुपच छान लेखनी सोपान खुडे सर यांनी केली आहे.
तमाशा कलावंताचे वास्तव दर्शी चित्रण खूपच चांगल्या पध्दतीने रेखाटले आहे.
आपल्या प्रेमाची परवा न करता केवळ तमाशा कलावंताची कला टिकून रहावी त्यांच्यावर आलेल्या उपास मारीतुन त्यांची सुटका व्हावी यासाठी एका तमाशा कलावंतीने एका धनाढय व्यक्तीशी आपल्या तारूण्याचा केलेला सौदा, त्यांची बोली भाषा,त्यांची राहण्याची पध्दती,त्यांचे पोशाख,जुन्या चालीरिती,नाचण्याची पध्दत,त्यांची वाजवण्याची कला,त्यांची विनोदाची शौली यांचे हुबेहुब चिञण लेखक सोपान खुडे सर यांनी या कादंबरी मध्ये केले आहे.
कादंबरीचा शेवट अतिशय भयानक दाखविण्यात आला आहे. तरी वाचकांनी ही कादंबरी नक्की वाचावी.