Summary of the Book
विड्याचे रंगढंग, गर्भारणीची चोळी, कॅलेंडर आर्ट, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्घीच्या हव्यासाबद्दल शिरीष कणेकर यांनी लिहिलेला लेख अशा विविधरंगी विषयांनी 'लोकप्रभा'चा अंक नटला आहे. फ्रात्झ काफ्का यांच्या 'अ हंगर आटिर्स्ट' या कथेचा आत्ताच्या काळाशी संदर्भ सांगणारा यशवंत रायकर यांचा 'उपोषणमहषीर्', माधवी देसाई यांची 'त्या तिघींच्या चित्तरकथा' ही कथा आणि कळवात समाजातील लावणीचे नेतृत्व करणाऱ्या तरुणीवरील लेख वाचनीय आहेत.