Summary of the Book
मिलान, रोम आणि पॅरीस येथे गेल्यावर तेथील समाजजीवन, तेथील शिक्षण पद्धती, तेथील मॉल या साऱ्याचा वेध घेऊन वैशाली पांढरीपांडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तीन महिन्यांच्या प्रवासात त्यांना भेटलेल्या व्यक्ती, आलेले अनुभव याचे छान वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे. इटली, फ्रान्समधील पांढरीपांडे यांचे हे अनुभव युरोप खंडातील वातावरणातील माहिती देतात. अमेरिकेवर बरीच पुस्तके आहेत, पण युरोपविषयी कमी लिखाण आहे. पांढरीपांडे यांचे पुस्तक वाचनीय झाले आहे.