Summary of the Book
‘उल्हास प्रभात’ हा गुरुनाथ बनोटे संपादित दीपावली विशेषांक नुकताच प्रसिद्ध झाला असून अंतरंगात सोन्याचा उंदीर (रश्मी कुलकर्णी), सगुणेचा संप (सुरेश ठाकूर), नियती (रवींद्र गुरव), प्राक्तन (सुमेधा वैद्य), भोवतीचे चेहरे (किरण जोगळेकर), प्रामाणिक गोपाळ ( अशोक कुमावत), उंच मनोर्याखाली (माधव गवाणकर), वेगळे मार्ग (सिंधू पाडळकर) आदी लेखक-लेखिकांच्या सत्यकथा तसेच आठवणी (वाय.जी.पवार), प्रेम कोणावर करावे (वसुधा गोसावी), बहिणाबाई (प्रकाश पोळ), अधुरी कहाणी (सुभाष वरुडकर) आदींच्या कवितांनी अंक सजला आहे. ज्योतिषाचार्य सोपान बुडबाडकर यांचे विस्तृत वार्षिक राशिभविष्य आणि बरेच काही या अंकात सामावलेले आहे. अंकाचे हे १७ वे वर्ष आहे.