Summary of the Book
महाराष्ट्र शसनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्रभूषण ’ या पुरस्काराच्या मानकऱ्यांचे कर्तृत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र भूषण’ या पुस्तकात डॉ. उषा खंदारे यांनी केला आहे. पु.ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावसकर, डॉ. विजय भटकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, डॉ. अभय व डॉ. राणी बंग, बाबा आमटे, डॉ. रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, दादासाहेब पाटील, नानासाहेब धर्माधिकारी, सुलोचना, डॉ. जयंत नारळीकर या ‘महाराष्ट्र भूषण’ प्राप्त मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वाची, कार्याची, स्वभाववैशिष्टय़ांची विस्तृत ओळख म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. या मान्यवरांचे विचार-आचार, त्यांनी यशासाठी केलेले प्रयत्न, मेहनत यांची माहिती लेखिका करून देते. हे पुस्तक वाचताना यश हवे असेल तर त्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही, याची प्रकर्षांने आठवण होते. या मंडळींनी अपयशाला समर्थपणाने तोंड दिले आणि त्यातून त्यांनी यशाचा मार्ग कसा शोधला याविषयीही लेखिका सांगते.