Hard Copy Price:
25% OFF R 260R 195
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
ब्लास्फेमी म्हणजे ईश्वरनिंदा, ईश्वराबद्दल वाईट बोलणारे. कादंबरीचे हे शीर्षक अत्यंत चपखल आहे. धार्मिक सत्तेच्या जोरावर समाजावर अवलंबित अत्याचार करणारे धर्ममार्तंड, त्यांची क्रूरता, ढोंग हे किती पराकोटीचे असू शकते याचे शहारा आणणारे चित्रण "ब्लास्फेमी"त आढळते. दक्षिण पाकिस्तानमध्ये घडलेल्या सत्य घटनेतून स्फुरलेली ही कांदबरी पराकोटीच्या दुत्त्वाचं कठोर दर्शन घडवते. रक्तपिपासू धर्मनेत्यांनी भ्रष्ट केलेल्या इस्लामचे स्वरूप कोणतीही लपवाछपवी न करता वाचकांपुढे ठेवण्याचे धाडसाचे काम ही कादंबरी करते. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी अलौकिक सुंदर असलेल्या वीरचा विवाह तिच्याहून अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या पीरसाई या धर्मगुरुशी होतो; पीरसाई स्वत: तिला आपल्या समक्ष अनेक अनैतिक कामे करण्यास भाग पाडतो. धर्मगुरुच्या हुकूमाने, त्याच्या हवेलीत भयंकर क्रूरकृत्ये केली जातात. आणि तीही अल्लाच्या नावाने.
खरंच मुळापासुन हादरवणारं पुस्तक. पुस्तकाची पार्श्वभुमी जरी इस्लामी असली तरी पुस्तकातल्या पुरुष व्यक्तीरेखा एकाच जागतिक मानसिकतेचं प्रतिनिधीत्व करतात. थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर एकाच वेळी स्त्रीची अनेक रुपं बघायला मिळतात.
नवऱ्याचे अनन्वित अत्याचार मुकाटयाने सहन करणारी एक "सहनशील स्त्री"
स्वतःच्याही नकळत कोणावर तरी मोहुन जाणारी हळुवार "प्रेमिका"
मुलीसाठी, मुलीला अशा अत्याचारापासुन वाचविण्यासाठी पाप पुण्याचा विचार न करता मार्ग शोढणारी "माता"
संयमी आतल्या आत धुमसत राहणारी "आणि संधी मिळताच जीव तोडुन वार करणारी "रणरागिणी चील"
अफ़ाट पुस्तक आहे.
Ramesh Dhage
17/10/2012
Injustice in the name of power above by the clergy class irrespective of religion is the real and only enemy of humanity on the globe. Enlightening education to all can help us move steadily towards the egalitarian society.