Summary of the Book
सुखी माणसाच्या सदऱ्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. सुखी स्त्रीच्या साडीविषयी काही ऐकलं आहेत?
डाउन्स सिण्ड्रोम हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल; पण `सावत्र आई सिण्ड्रोम' असू शकतो असं तुम्ही कधी मानलंय?
भाषा वापरण्यात, ऐकण्यात तुमचा जन्म गेलाय; पण आज आपण फारच अनुवादित भाषा वापरतोय हे तुम्हाला जाणवलंय?
रोजच्या जगण्याविषयी, रोज वापरतो त्या भाषेविषयी, रोज कानांवर पडणाऱ्या गाण्यांविषयी, नेहमीच्या वाचनातल्या पुस्तकांविषयी, हसत खेळत छोटी-मोठी भाष्यं करणारा हा ललित लेखसंग्रह तुम्ही वाचायलाच हवा.
सुखी स्त्रीची साडी मिरवायला कोणाही बाईला आवडेल यात शंकाच नाही; पण सुखी स्त्रीच्या साडीचा लहरता पदर निरखायला पुरुषांना आवडणार नाही असं थोडंच आहे? वाचून तर बघा!