Summary of the Book
परदेश प्रवास करण्याची इच्छा अनेकांना असते. काहींना ही संधी साधना येते. सध्या पर्यटनासाठी परदेशगमन करणे सोपेही झाले आहे. पर्यटन कंपनीबरोबर परदेश बघण्यासाठी गेलेल्या रवींद्र जोशी यांनी तेथील अनुभव 'सातासमुद्रापल्याड'मधून लिहिले आहेत. थायलंड, सिंगापूर येथे पहिल्या प्रवासापासून अमेरिका, पॅरिस, स्वित्झर्लंड, रोम आदी ठिकाणची पर्यटन स्थळे, तेथील नागरिक, सहप्रवासी याबद्दल ते सांगतात. त्यामुळे परदेश प्रवासाचे हे वर्णन वाचनीय झाले आहे.