Summary of the Book
भक्तीमार्गाचा प्रसार प्रामुख्याने महाराष्ट्रात झालेला दिसतो. डॉ. रा. प्र. पारनेकर महाराज यांनी भक्तिसूत्रांचा मूळापासून अभ्यास करून त्याचे विवेचन केले आहे. भक्तिसूत्रांची आधुनिक काळाशी त्यांनी सांगड घातली. हेच विवेचन पुस्तकरूपाने उपलब्ध आहे.
भक्तीबरोबर कर्म आणि ज्ञानाची साधना करणेही आवश्यक आहे. त्यामुळे जीवन सुरळीत होते, असा संदेश यातून मिळतो. या पुस्तकाचे भक्तिसूत्र आणि योगदर्शन असे दोन विभाग आहेत. पहिल्या विभागात शांडील्य सूत्र आणि नारद भक्तीसूत्र यांचा अर्थ सांगून कृष्णजन्मोत्सव, भक्ती आदींवरही भाष्य केले आहे.
दुसऱ्या विभागात समाधीपाद, विभूतीपाद, कैवल्यपाद आदींचे विवेचन आले आहे. सविकल्प आणि निर्वीकल्प समाधीतील फरक उलगडला आहे.