Hard Copy Price:
25% OFF R 299R 224
/ $
2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 299R
225
/ $
2.88
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
काही माणसं नेहमीची चौकट सोडून जगतात आणि त्या चौकटीबाहेरचं जग किती सुंदर आहे, हे आपल्याला दाखवून देतात. अशा ह्या अनवट वाटेवरच्या वाटसरूंची ही गोष्ट आहे. आपलं आणि इतरांचं जगणं अर्थपूर्ण करणारी ही मंडळी आपल्याला बरंच काही देऊन जातात. ही माणसं म्हणजे माणुसकीला दिलासाच. वेगळ्या वाटेनं चालू पाहणारे हे लोक आसपासच्या अनेक तरुणांना चैतन्याची वाट दाखवून देतात. अशा या वेगळ्या वाटेवरच्या आपल्यातल्याच वेगळ्या माणसांविषयी वाचूया या पुस्तकात!
वेगळ्या वाटेवरच्या आपल्यातल्याच काही वेगळ्या माणसांमध्ये माझा समावेश करून घेतला आणि मी केलेल्या कामाला अतिशय सुंदर शब्दात शब्दबद्ध करून “पाथफाईंडर” या पुस्तकात मला समाविष्ट करून घेतल्याबद्दल लेखिका दीपा देशमुख Deepa Deshmukh यांचे मी आभार मानतो...
आपण केलेल्या कामाची पोचपावती अनेक माध्यमातून मिळत असते... त्यातून खरंच जबाबदारी वाढत जाते तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या...
रमा नाडगौडा Ramaa Atul Nadgauda mam तुमच्यामुळे हे शक्य झाला आहे...
सुमित पाटील
Shital Deshpande
11 Jun 2020 05 30 AM
तुम्ही एकतर रस्ता शोधा किंवा नवीन रस्ता बनवा..
मी दुसरा पर्याय निवडला. या दुसऱ्या पर्यायाची छोटीसी कहानी प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी पाथफाइंडर्स या त्यांच्या नवीन पुस्तकात मांडली आहे. महाराष्ट्रातील २५ वेगळ्या वाटेवरची वेगळी माणसं त्यांच्या संघर्षाची कहाणी म्हणजे "पाथफाइंडर्स" पुस्तक.
दीपाताई चे पुस्तक का वाचावे?
तर यात आमच्या 25 out of box thinking करणाऱ्यांची गोष्ट आहे म्हणून नव्हे.. तर दीपाताई यांच्या लेखणीतून तुम्ही सर्वजण out of box विचार करू शकतात याचा आत्मविश्वास देते.. नुसताच आत्मविश्वास नाही तर पुस्तक वाचताना वेगळा विचार कसा करावा याची प्रोसेस पण समजते. चला या दिवाळीत सर्वांना हे पुस्तक भेट देऊन स्वतः प्रेरणा घेऊ आणि दुसऱ्यांना त्यांचा पाथ फाइंड करायला मदत करू.
याची प्रस्तावना सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी लिहिली आहे. ते म्हणतात, "हे पुस्तक वाचकाला स्वतःची वाट शोधायला मदत करणार आहे." मला जास्त आनंद याचा आहे या पंचवीस जणांमध्ये आपल्या नाशिकचे विश्वासजी ठाकूर, सुनीलजी खांडबहाले, विनायकजी रानडे हे सुद्धा आहेत. दीपाताई मनापासून धन्यवाद.