Hard Copy Price:
25% OFF R 240R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
' मराठा राजघराण्यातील स्त्रिया ' या ग्रंथाच्या लेखिका डॉ . स्मिता साहेबराव शिंदे यांनी मराठेशाहीतील स्त्रियांचा राजकीय आणि प्रशासकीय सहभाग शोधण्याचा प्रयत्न केला आहे . या ग्रंथातून राजस्त्रियांचा कर्तुत्वाची योग्य ती दखल घेण्यासाठी लेखिकेने प्राथमिक व दुय्यम साधनांच्या अभ्यासाद्वारे अनेक तपशील पिंजून काढले आहेत . संशोधनार्थ घेतलेले त्यांचे कष्ट प्रशंसनीय आहेत . मराठ्यांच्या इतिहासातील एका दुर्लक्षित पैलूंवर हा ग्रंथ प्रकाश टाकतो आणि मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाला आपल्या परीने काही योगदान करतो . मराठेशाहीतील काही स्त्रियांच्या कामगिरीचा सुटासुटा चरित्रात्मक विचार झालेला आहे . पण डॉ . स्मिता शिंदे यांनी समग्रतेने मराठेशाहीतील स्त्रियांच्या राजकीय व प्रशासकीय सह्भागांविषयी संशोधन केले आहे . त्यात छत्रपती , पेशवा या सत्ताधारी घराण्यातील स्त्रियांच्या योगदानाची व्यक्तिगणिक , सविस्तर व साधार चर्चा केली आहे . मध्ययुगीन पुरुष प्रधान संस्कृतीत वाढलेल्या या कर्तुत्ववान स्त्रियांनी संकटात सापडलेल्या मराठी राज्याला प्राणपणाने जपले . या स्त्रियांच्या कर्तबगारीमुळेच दख्खनच्या राजकारणात मराठ्यांची सत्ता स्थापन होण्यास आणि ती टिकून राहण्यास मदत झाली . एकंदरीत राजघराण्यातील स्त्रियांच्या कर्तुत्वाचा हा समग्र आलेख लेखिकेने प्रामाणिकपणे व विचारपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला आहे . तेव्हा या ग्रंथाचे वाचकांकडून स्वागत होईल , असा विश्वास वाटतो .