Summary of the Book
सर्वसामान्य माणसाला पोलीस ठाणे, पोलीस प्रक्रिया अथवा पोलिसांसंबंधातील कायद्यांची माहिती नसते. उलट अनेकदा गैरसमज असल्याचेच दिसते, परंतु संबंध आला नाही तरी सामान्य माणसाला त्या संबंधातील माहिती असणे जरुरीचे असते.
उज्वलकुमार माने यांनी हे काम सोपे केले आहे. या पुस्तकात एकूण १७ प्रकरणे असून, त्याद्वारे पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यापासून ते न्यायालयीन कारवाईपर्यंतचे पोलिसांचे अधिकार, पोलिसांची कर्तव्ये, नागरिकांचे हक्क, त्यांचे अधिकार अशी सर्व माहिती मिळते. कायद्याच्या इतिहासापासून ते माहिती अधिकार कायदा, सावकारी कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, महिलाविषयक कायदे, विवाहविषयक कायदे, अवमानविषयी कायदा, मोटारवाहनविषयक कायदे याबारोबारच सायबर क्राईमविषयी माहिती मिळते.