Hard Copy Price:
25% OFF R 190R 142
/ $
1.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
बाबा आमटे यांचे नाव घेताच आनंदवन प्रकल्पाची आठवण होते. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी आनंदवनाची निर्मिती केली. चंद्रपूर, गडचिरोली भागातील आदिवासींसाठी त्यांनी प्रकल्प उभे केले.
दोन वेळा 'भारत जोडो ' यात्रा, नर्मदा बचाव आंदोलन यातील सहभाग यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या बाबाच्या सहवासात विलास मनोहर ३१ वर्ष राहिले. या प्रदीर्घ काळातील बाबांच्या आठवणी त्यांनी 'मला (न) कळलेले बाबा 'मधून लिहिलेल्या आहेत.
बाबांच्या सहवासातील सुरुवातीचे दिवस, भारत जोडो यात्रा, कसरावदचे मुक्काम, मुंबईत बाबांची शस्त्रक्रिया या व अन्य काही वेळा मनोहर यांना बाबांचा निकटचा सहवास लाभला. समाजव्रती, कवी मनाचे, जवळच्या व्यक्तींवर रागावणारे, तर कधी राग, चीड गिळून टाकणारे संस्थेसाठी, त्यातील माणसांसाठी झटणारे बाबा त्यांनी अनुभवले आहेत.
त्यांचा गमतीदार स्वभाव, संगीताची, वाचनाची आवड अशा सर्व आठवणी वाचताना बाबा आमटे यांचे कर्तृत्व, जिद्द, कामाचा झपाटा लक्षात येतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व कंगोरे यातून उलगडले आहेत.