Summary of the Book
या पुस्तकात पातंजलयोगप्रदीप, हठयोगप्रदीप, घेरंड संहिता, वसिष्ठ संहिता आदी प्राचीन आणि प्रमाणित ग्रंथांचा सारांश देण्यात आला आहे. त्याचबरोबरच; अष्टांगयोग, योगासन, प्राणायम, मुद्रा, हस्तमुद्रा, बंध, उर्जादायक विशेष आसने आणि क्रिया, ध्यान, षटकर्म, कुंडलिनी योग, नभीचिकित्सा,सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार आणि हास्ययोग-चिकित्सा यांसारख्या विषयांवर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तकात, योगाच्या सहाय्याने जगण्याची कला, योग आणि आयुर्वेद यांचा संबंध, योग आणि मानसिक स्वास्थ्य, कोणत्याही विशिष्ठ रोगात कोणते आसन आणि आहार उपयुक्त आहे आणि कोणते आसन व आहार वर्ज्य आहे, योग्य आहाराचा उपयोग, संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करण्याच्या पद्धती, तणावाला प्रतिबंध करण्यातील योगाची भूमिका, अॅक्युप्रेशर आदी विषयांची समग्र माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर; शास्त्रीय कारणांसह योगाचे विवेचन करण्यात आले आहे.
हे पुस्तक म्हणजे, 'योगविद्या आणि त्यावर आधारित उपचारपद्धती' या संदर्भातील एक संपूर्ण 'संहिता' आहे. ती आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भौतिक व आध्यात्मिक सुख मिळवून देईल.