Summary of the Book
पंखांवरची ओल हा प्रमोद कोपर्डे यांचा पहिलाच ललित लेख संग्रह आहे. "कसदार ललित लेखनात व्यक्ती, समष्टी आणि सृष्टी यांची तिपेडी वीण असते' हे विधान कोपर्डे यांच्या ललित लेखनाला तंतोतंत लागू होते.
आसपास खूप काही घडत असते, त्यातले सगळेच नाही; पण अस्वस्थ करणारे असे काही थेट खोलवर रुतून राहते. सार्वजनिक जीवनात विविध परिवर्तनाच्या चळवळींत एक कार्यकर्ता म्हणून आलेले अनुभव, जवळच्या जीवलगांचे कायमचे तुटणे वा निघून जाणे, प्रवासात भेटलेली बुजुर्ग माणसे, त्यांचे जीवनाबद्दलचे तुकोबांचे साधे-सोपे; पण जगण्यात आणायला अवघड असलेले तत्त्वज्ञान, कुठे अचानक भेटून जाणारी कविता, निसर्गाशी असणारे लहानपणापासूनचे जिव्हाळ्याचे गहिरे नाते, मनात खोलवर लपून बसलेली आणि आपल्याही नकळत उफाळून येणारी मनातली हिंसा हे कवितेत पकडताना पाऱ्यासारखे निसटून जाणारे अनुभव ते या ललित लेखनात पकडताना दिसतात.
या संग्रहात एक अनुभव विविध पातळ्यांवर आणि प्रतिक्रियांच्याही विविध टप्प्यांवर समजूतदारपणे व्यक्त झालेला दिसतो.