Summary of the Book
लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार विजेते लेखक डॉ. रवींद्र शोभणे यांच्या समीक्षाविषयक लेखांचा हा संग्रह. डॉ. शोभणे यांनी आपल्या समीक्षेत कोणताही विषय त्याज्य मानलेला नाही. नवे विषय आणि साहित्यातील नवे प्रवाह शोधून शोभणे यांनी विविध साहित्यकृतीचे परीक्षण केलेलं आहे. त्यांच्या या पुस्तकातसुद्धा त्यांनी किती वेगवेगळ्या पुस्तकांवर आणि लेखकांवर लिहिलं आहे आणि त्यातील समकालिनांचा वेध घेत त्यांचं मूल्यमापन केलं आहे, याचा प्रत्यय येतो. पुस्तकातील पाच परिशिष्टेदेखील आवर्जून वाचण्यासारखी आहेत. त्रिमिती या समीक्षाग्रंथात शोभणे यांच्या लिखाणातील निरामयता आणि विश्लेषणातील समतोल तसेच वाङ्मयाकडे संवेदनशीलतेनं पाहण्याची दृष्टी दिसून येते.