Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
ख्रि. सर डोनाल्ड ब्रॅडमन (स. 1908-2001) यांचं चरित्र म्हणजे क्रिकेट क्षेत्रातला एक महान चमत्कार म्हणायला हवा.
सामान्य परिस्थितीतला, एका सुताराचा मुलगा आपल्या क्रिकेटमधल्या असामान्य व अद्वितीय पराक्रमाच्या जोरावर ब्रिटिश राज्यकत्याकडून `सर’ पदवी (1949) अन् तीहि खेळातून निवृत्त होण्यापूर्वी मिळवितो हा एक चमत्कारच नव्हे काय? विशीत त्यानं 452 धावांचा जागतिक विक्रम करून त्याच वर्षी (स. 1930) कसोटी सामन्यात एका दिवसात 309 धावा करून अशक्य कोटीतला विक्रम त्यानं केला. तो धावा इतक्या जलद व वेगानं काढी की त्याचा उल्लेख `धावांचं यंत्र’ असा केला जाई. आपल्या इंग्लंडच्या चारही दौर्यात (स. 1930, 1934, 1938 व 1948) त्यानं दोन हजाराच्या वर धावा काढण्याचा विक्रम केलेला आहे.
ब्रॅडमन यांच्या खेळातील वेग व जोष पाहून इंग्लिश क्रिकेट संघाला त्यांच्या विषयी असूया व मत्सर वाटू लागला. म्हणून 1932-33 च्या ऑस्ट्रेलियन मालिकेत इंग्लिश गोलंदाजांनी त्यांच्या धावांना खीळ बसावी म्हणून तुफान गोलंदाजीचा प्राणांतिक मारा एम.सी.सी.च्या क्रिकेट संघानं त्यांच्यावर केला. पण तरीही त्यांच्या बॅटिंगचा बहर काही कमी झाला नाही.
पराक्रमाच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही ब्रॅडमननी शिस्त कधी बिघडवली नाही. कसल्याही प्रलोभनांना पळी न पडता ते निर्व्यसनी राहिले. खेळाला आवश्यक असलेली सारी पथ्यं त्यानी कटाक्षानं पाळली. त्यामुळं चाळिशीत असतानाही त्यांच्या बॅटिंगचा कस कधी कमी झाला नाही. योग्य वेळी क्रिकेट सारख्या महान खेळातून निवृत्त (1949) होण्याचा शहाणपणा व समयज्ञता त्यांनी दाखविली. त्यांची जागतिक कीर्ती एवढी की ब्रिटिश ज्ञानकोशानं, हिटलर पेक्षाही त्यांच्या चरित्राला आधिक जागा दिली.
ब्रॅडमन यांचं साधार, विस्तृत व सचित्र चरित्र, मराठीत नाही. प्रस्तुत चरित्रात त्यांची व्यक्तिरेखा ठसठशीतपणं रेखाटली असून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा सारा तपशील लेखकानं दिलेला आहे.
आपल्याकडील उदयोन्मुख व होतकरू क्रिकेटपटूंना ब्रॅडमन यांचं चरित्र दीपस्तंभा सारखं मार्गदर्शक ठरेल. ब्रॅडमन यांच्यासारखा क्रिकेटपटू शतकात एकदाच होतो. आपल्या नेत्रदीपक व चमकदार फलंदाजीनं त्यानी क्रिकेट मध्ये जणू एक खास युगच निर्माण केलं. म्हणूनच त्याना युगप्रवर्तक क्रिकेटपटू म्हटलं जातं.