Summary of the Book
वीरांगना रजिया सुलतान हिच्या जीवनावर आधारित ज्येष्ठ हिंदी लेखक मेवाराम यांनी लिहिलेल्या कादंबरीचा किमया किशोर देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे. रजिया सुलतान ही राज्यकारभार करणारी पहिली तुर्क महिला राज्यकर्ती होती. शूर, साहसी, धैर्यवान, न्यायप्रिय, उदार आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारी होती. बुरखा काढून पुरूषी वेश परिधान करून तिने कारभार केला.
मेवाराम यांनी रजीयाच्या या सर्व गुणांचे दर्शन घडविले आहे. १२३६ साली तिच्या हाती कारभार आला. त्या वेळच्या धर्ममार्तंडांना ते खुपत होते. त्यांनी तिला कळसूत्री बाहुली बनवून राज्य चालविण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. तिचे एका गुलामावर प्रेम बसले. अखेर गुलामाच्या मृत्यूत आणि राजीयाच्या कैदेत झाली.