Summary of the Book
चित्र काढायला शिकवल्यानंतर आता त्यात रंग कसे भरायचे हे शिकवण्यासाठीच 'रंगलेपन: तंत्र व मंत्र' या पुस्तकाची निर्मिती त्यांनी केली आहे. खरंतर लहानपणी भेट मिळालेल्या स्केचपेन आणि रंगीत खडूंपासून मुलं काहीतरी रंगवायला सुरुवात करतात. त्यावेळी त्यांना रंगलेपन तंत्राचं काहीही भान नसतं. ते भान देण्याचं काम हे पुस्तक अचूक करतं.
हे पुस्तक थोड्या जाणत्या वयातील मुलांसाठी आहे. कारण लहानपणी निव्वळ टाइमपास म्हणून एखाद्या चित्रात भरलेले रंग आणि जाणत्या वयात जाणीवपूर्वक रंग भरण्याचा केलेला प्रयत्न यात फरक असतो. मात्र जाण आलेली असली, तरी प्रत्येक वेळी रंग आणि रंगलेपन तंत्राची माहिती असतेच असं नाही.
ज्यांना ती माहिती करुन घ्यायची असेल, त्यांना वझे यांचं हे पुस्तक खूपच उपयोगी पडेल. विशेष म्हणजे या पुस्तकात पोस्टर कलर, वॉटरकलर, कलर पेन्सिल, ऑईल पेस्टल आणि कलर मार्कर अशा वेगवेगळ्या माध्यमांतील रंगलेपन पध्दतीची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली आहे. त्यामुळे केेवळ सुटुटीतच नव्हे, तर ज्यांना चित्रकलेची खरीखुरी आवड आहे, अशांना हे पुस्तक खुपच उपयुक्त ठरेल.