Summary of the Book
भारतीय संस्कृती परंपरेचे संस्कारधन पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम डॉ. अरविंद नेरकर यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. त्या द्रुष्टीने पुस्तकाची रचना केली आहे. प्रारंभ प्रतिज्ञेने होतो. 'खरा तो एकची धर्म' हे कायम गुणगुणावेसे वाटणारे प्रार्थना गीत, प्रात:स्मरण, भोजनाच्या वेळची प्रार्थना, सायंप्रार्थना असे नित्यानियमाचे पठण साहित्य टप्प्याटप्याने दिले आहे.
समर्थ रामदास स्वामी शिकवण, मनाचे श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र, पसायदान अशा मजकुराचाही समावेश आहे. याशिवाय राष्ट्रगीत, वंदे मातरम, ध्वजगीत, यांच्यासह ज्ञानेश्वर हरिपाठ, अथर्वशीर्ष, आरती, अभंग, गायत्री मंत्र, शांतीमंत्र असा विविधांगी मजकूर पुस्तकात आहे. आईला वंदन करणारे पद्य, राष्ट्रपुरुषांचे स्मृतिसाहित्यही वाचायला मिळते. एकूणच घरात नित्य संग्राह्य असे हे पुस्तक.