Hard Copy Price:
15% OFF R 350R 298
/ $
3.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या गृहिणी, सखी, सचिव बनून आयुष्यभर सावलीसारख्या राहिलेल्या साधना आमटे यांचे हे चरित्र आहे. बाबा आमटे. यांच्यासारख्या आगळ्या व्यक्तीमत्वाचा जगावेगळा संसार करणं ही सोपी गोष्ट नाही. साधनाताईंनी हे आव्हान पेलले. त्यात त्यांचे व्यक्तिमत्वही घडले. आमटे यांची कडवी तत्वनिष्ठा, संकटे अंगावर घेण्याची हौस, कुष्ठरोग्यांसंबंधीचे त्यांचे कार्य आदींशी जुळवून घेऊन साधनाताईंनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांच्या दांपत्यजीवनाबरोबरच साधनाताईंच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची ओळखही पुस्तकातुन होते. मुलांचा विकास करणारी आई समोर येते. आनंदवनाच्या अंतरंगात प्रवेश होतो. सीताकांत प्रभू यांनी या चरित्राचे लेखांकन केले असून, पुस्तकाला राम शेवाळकर यांची साक्षेपी प्रस्तावना लाभली आहे.
समिधा.. हे आत्मचरित्र साधनाताईंच्या प्रेम,संघर्ष, जिद्द, त्याग
व आदिवासींसाठी असलेला दयाभाव यातून स्पष्ट होते, आजच्या काळासाठी हे आत्मचरित्रपर पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे..
Supriya Ghude
24/02/2015
हे पुस्तक वाचून, बाबा आमटे यांच्या जीवन कार्याला वाहून घेतलेली अर्धांगिनी यापलीकडे साधना आमटे यांची ओळख व्हायला मदत होते. त्यांच अलंकारिक लिखाण 'इंदू' ताईं मधल्या लेखिकेची साक्ष देते. पुस्तकामध्ये आमटे परिवाराच्या समाजकार्याचा 'आंखो देखा हाल' पाहून वाचक नतमस्तक होईल, यात शंका नाही.
sneha kadam
10 May 2013 05 30 AM
sundar ani paripurn pustk pratekane vachav as chan pustak.