Summary of the Book
नेहमीचे पर्यटन आणि नर्मदा परिक्रमा यात फरक काय, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर आनंद चंद्रसेन राजेशिर्के यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचावे लागेल. बहुतेकवेळा ही परिक्रमा पायी केलेई जाते. ती अत्यंत खडतर, कठीण असते. राजेशिर्के यांनी वाहनातून परिक्रमा केली आहे. त्यामुळे ही वेगळी ठरली आहे.
परिक्रमेचे वेगवेगळे प्रकार, सहप्रवासी, प्रवासात भेटणारी वेगवेगळी व्यक्तिमत्वे, मानवी प्रवृत्ती आदिसंबंधीची त्यांची निरीक्षणे या पुस्तकात आली आहेत.. नर्मदेचा पूर्व इतिहासही ते सांगतात. तसेच प्रवासात लागणाऱ्या गावांची यादी, नकाशा, नर्मदा तीरावर होणारे मेळे या माहितीचा समावेशही त्यांनी केला आहे.एवढेच नव्हे तर छोट्या गाडीने २५ दिवसांत परिक्रमा, रेल्वेने परिक्रमा, रस्त्याने परिक्रमा आयोजीत करणाऱ्या प्रवास कंपन्यांची नावेही दिली आहेत..