Summary of the Book
महाविद्यालयीन प्राध्यापक म्हटले कि अभ्यासू, ज्ञानी, विद्यार्थीप्रिय अशी त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते; पण गेल्या काही वर्षांत या प्रतिमेला तडे जाऊ लागले आहेत. प्रा. हि उपाधी एक चेष्टेचा विषय बनली आहे. या बदलेल्या परिस्थीचा आढावा घेत आजच्या प्राध्यापकांच्या भूमिकेवर जयदेव डोळे यांनी प्राध्यापक लिमिटेड मधून कोरडे ओढले आहे.
सच्चा, विद्वान व विद्यार्थीनिष्ठ प्राध्यापकांची संख्या नगण्य आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालये पुढाऱ्यांचा, नोकरशाहीच्या हातात गेल्याने पदे, सत्ताधिकार, पैसा, भत्ते, प्रतिष्ठा याला महत्व आले आहे. यातूनच अगदी सुमार बुद्धीचे लोक शिक्षण क्षेत्रात उच्चपदी पोचलेले दिसतात.
त्यामुळेच डोळे यांनी प्राध्यापकांची पुरोगामित्व अशा विविध लेखांमधून आजची प्राध्यापकांची पुरोगामित्व अशा विविध लेखांमधून आजची प्राध्यापकीची अवस्था स्पष्ट करून त्याबद्दलची खंत व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापकांसंदर्भातील विचारांची, म. वा. धोंड यांच्यासारख्या संशोधकाची आज किती गरज आहे, हेही यातून अधोरेखित केले आहे.