Summary of the Book
बहुजनांचे नेतृत्व असे संबोधले जाणारे आणि अभ्यासू वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेले अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे उमेश चव्हाण यांनी लिहिलेले हे चरित्र आहे. कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून लिहिलेल्या या चरित्रात आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी वेध घेतला आहे.बहुजन चळवळीतील त्यांचे योगदान, मराठवाडा नामांतराच्या वेळी त्यांनी बजावलेली महत्वपूर्ण भूमिका किंवा गायरान जमिनी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी व्यवस्थापन, भ्रष्टाचार या विरोधात त्यांनी केलेल्या आंदोलनाची माहिती या चरित्रातून मिळते.
राजकीय आरक्षण नाकारून आमदारांना निवडून आणणारे आंबेडकर जसे दिसतात तसेच उपेक्षितांसाठी काम करणारे नेतेही या लेखनातून स्पष्ट होतात. याबरोबरच त्यांचे वाचनवेड, आंतरजातीय विवाह याबद्दलही भाष्य आहे.