देव जो भूवरी चालिला
शिरडीचे श्री साईबाबा यांचे जीवनचरित्र
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
रंगास्वामी पार्थसारथी यांनी लिहिलेल्या 'गॉड टू वॉक्ड् ऑन अर्थ’ या शिर्डीचे श्री साईबाबा यांच्या चरित्राचा अनुवाद.
साईबाबा कोण होते ? ते कुठून आले ? त्यांचा संदेश कोणता ? त्यांना साक्षात परमेश्वर मानून लोक त्यांची पूजा कशामुळे करू लागले ?
साईबाबांना चालता बोलता ईश्वर समजतात. त्यांच्याविषयी आपल्या मनात उभ्या राहणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरे या चरित्राद्वारे आपल्याला मिळतात. जीवनाच्या सर्व स्तरावरील लहान मोठ्या माणसांची मने त्या महात्म्याने काबीज केली आणि त्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. त्यांच्या भक्तांमध्ये गरीब होते, तसेच श्रीमंतही होते. विद्वान होते, तसेच अशिक्षित आणि अडाणी सुद्धा होते. साईबाबांविषयी आजवर बरेच काही लिहिले गेले. पण त्यांच्या जीवन कालखंडाचे अत्यंत सुसूत्र, सुसंगत आणि वस्तुनिष्ठ वर्णन अशा प्रकारे प्रथमच लिहिले गेले आहे; व ते ही अत्यंत प्रवाही व प्रासादिक शैलीत ! बाबांची तत्त्वे आणि त्यांचे जीवन या विषयीचे तपशीलवार आणि नेटके रेखाटन यात आहे.
शिरडीस आलेल्या एका आगळ्या वेगळ्या फकिराची ही मनोवेधक कहाणी आहे. त्याला मुलांनी खोड्या काढून सतावलं. गावकर्‍यांनी त्याची हेटाळणी केली. पण याच फकिराने पुढे सार्‍या अध्यात्मिक जगतावर आपलं अधिराज्य गाजवलं. या भूतलावर चालणारा तो साक्षात् परमात्मा झाला. हे चरित्र प्रत्येक साईभक्ताला संग्रही ठेवावंसं वाटेल. बाबांनी केलेल्या उपदेशाचं हे जणू बायबलच आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या घरांमधील देवघरे ज्या महात्म्याच्या तसबिरींनी सुशोभित झाली आहेत, त्या महात्म्याचं हे पुण्यस्मरण आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat