Summary of the Book
पावसाच्या अंदाजाला आपल्या कृषिप्रधान देशात महत्व आहे. शेतकरी, उद्योजकांपासून सामान्यांपर्यंत सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून हवामानाच्या, पावसाच्या अंदाजाविषयी भविष्यवाणी केली जाते. आधुनिक काळात हवामानाचा अंदाज वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्यामार्फत सांगितला जातो.
मात्र तो त्रोटक स्वरूपात असतो. यासाठी हवामान विशेषतः निसर्ग विज्ञानातील महत्वाचा घडत असलेल्या पावसाची सर्व माहिती प्रल्हाद जायभाये यांनी 'पावसाचे निसर्ग विज्ञान' मध्ये दिली आहे. ढग कसे तयार होतात.
पाऊस कसा पडतो, ढगफुटी म्हणजे काय, आकाशातील रंग व त्यांचे आविष्कार, पावसाचे अनुमान, दुष्काळ, वादळ यांची माहिती रंजकपणे यात दिली आहे. सध्या पावसाचा लहरीपणा आपण अनुभवत आहोत. त्या पार्श्वभूमीवर पाऊस म्हणजे नक्की काय, हे या पुस्तकातून समजून घेता येते.