Summary of the Book
गोपाळ गलगली यांची ही अर्थविषयक गाथा आहे. शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने-चांदी, प्रॉपर्टी, बँक, इन्शुरन्स यात गुंतवणूक कशी करावी याचं मार्गदर्शन त्यांनी त्यातून केलं आहे. याशिवाय प्राप्तिकर आणि इतर कर; तसेच सेवानिवृत्ती/इच्छापत्र यासंबंधीची माहितीही दिली आहे. ही सर्व माहिती देताना सर्व वयोगटांचा विचार केला आहे, हे विशेष. गुंतवणुकीचे दोन भाग करा - एक मूळ गाभ्यातली आणि दुसरी गाभ्याबाहेरची, प्रमाणाबाहेर गुंतवणूक फायदेशीर ठरत नाही, जोखीम घेण्याची वृत्ती हवी, गुंतवणुकीचे दरवर्षी परीक्षण करा अशा युक्तीचा चार गोष्टीही पुस्तकात सांगितल्या आहेत.