Summary of the Book
कम्प्युटरच्या सह्याने फोटोसंबंधी अनेक गोष्टी करता येतात. त्यासाठी प्रोग्रॅम लागतो. फोटोशॉप हा फोटोसंबंधीचा एक महत्वाचा प्रोग्रॅम आहे. फोटोंचे स्कॅनिंग, एडिटिंग, कोलाज, वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी अक्षरे अशा कितीतरी गोष्टी फोटोशॉपच्या मदतीने करता येतात. नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी या पुस्तकात या प्रोग्रॅमविषयी साद्यंत माहिती दिली आहे. फोटोशॉपमध्ये कॅमेरामधून काढलेल्या फोटोंमध्ये येणारे प्रॉब्लेमही सोडवता येतात.
व्हिडिओ फाइलमध्ये कलर, लाईटनिंग, आर्टिस्टीक इफेक्ट अॅड करता येतात.फोटोशॉपच्या नव्या व्हर्जनमधील सर्व गोष्टी या पुस्तकातून शिकता येतात. सुरुवातीच्या प्रकरणांमधून वेगवेगळ्या प्रकारची टूल शिकवली आहेत. नंतर कलर थेअरी, रेझोल्युशन आणि इमेज साइज, फिल्टर, मोडाच वापर आणि ड्युटोन, करेक्शन, अॅनिमेशन अशा टप्यांमधून विस्तृत माहिती मिळते. पुस्तकासह मोफत सीडीही देण्यात आली आहे.