Summary of the Book
स्वयंपाकाची आवड असणा-या लहानमोठ्या वयाच्या सर्व स्त्रियांना या पुस्तकाचा उपयोग होईल.
गृहिणीने केलेल्या सुग्रास स्वयंपाकावर घराचे समाधान आणि घरातील माणसांचे आरोग्य अवलंबून असते. गृहिणीने आपल्या घरातील सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळून सुग्रास पाकसिद्धी करणे व त्यांना संतुष्ट ठेवणे ही सुखी व समाधानी संसाराची गुरूकिल्ली आहे. हल्ली मुली शाळा, महाविद्यालयाच्या शिक्षणात गढलेल्या असतात. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाची तोंडओळख होत नाही. लग्न झाल्यावर व्यवसाय, नोकरी किंवा करियर करण्याची ओढ असते. परंतु गृहिणीपणाची स्त्रीसुलभ इच्छा स्वस्थ बसू देत नाही. नवनवीन चवदार पदार्थ व सुंदर स्वयंपाक करावासा वाटतो.
अशा होतकरू मुली आणि नवविवाहित तरूणींना उपयोगी पडावे असे हे पुस्तक आहे.