Summary of the Book
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर काय करायचे, हा प्रश्न अनेकांना सतावतो. एक वेगळे आयुष्य पुढे येते. कधी त्याचा ताण मनावर येतो, पण त्यातूनच आत्मवळही मिळते. मनावर आलेले मळभ, घुसमट दूर होते. गो. वि. कुलकर्णी हे प्राध्यापक पेशातून निवृत्त झाले. नोकरीतील काल त्यांना सुखावत होता, तृप्त वाटत होते तरी मनात खळवळ होती. ती त्यांनी झावळघुसमट मधून व्यक्त केली आहे त्यातील लेखनातून तत्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास दिसतो. त्यांचे नोकरीतील व निवृत्तीनंतरचे आयुष्य, संबंधित व्यक्ती, नातीगोती, सभोवतालची परिस्थिती याविषयीचे अनुभव हे सर्वसामान्यांना जवळचे वाटतात.