Summary of the Book
'कोनाकोनांनी घडवलेल्या त्या चेहऱ्यावर नाक नव्हतं. ती एक कवटी होती. डोळ्यांच्या खोबणी रिकाम्या होत्या. नाकाच्या जागी त्रिकोणी फट होती. आणि पांढऱ्या हाडातील पांढरे दात भीषण हास्यात विचकले होते... मग काळ्या वस्त्राखालून दोन हात वर आले... सांगाड्यांचे दोन अर्थींचे हात... पांढऱ्याफेक काड्याकाड्यांचे ते दोन हात दोन बाजूंना पसरले.'
वाचता वाचता अंगाचा थरकाप होतो. हेच नारायण धारप यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. धारपांच्या अशा १४ कथांचा हा संग्रह आहे. विलक्षण गुढ वातावरण निर्मिती करून वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणाऱ्या कथा घाबरवून सोडतात. मात्र, त्या जगात संचार करण्याचा मोहही टाळता येत नाही. धारप यांच्या नेहमीच्याच शैलीतील वर्णने या कथात वाचायला मिळतात.