Hard Copy Price:
15% OFF R 80R 68
/ $
0.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'जगण्यातल्या कोणत्याच प्रश्नाला तत्त्वज्ञानाकडून तयार उत्तर मिळत नाही. उलट, ते त्या प्रश्नाच्या दुतर्फा आणखी नवे प्रश्नच उभे करतं. कवितेची वाट या दुतर्फा प्रश्नांच्या मधून जाते. तीही पोचत नाही कोणत्याच उत्तराच्या मुक्कामाशी. पण ती जाता जाता दोन्ही बाजूंच्या प्रश्नांची ओळख करून देते. हे प्रश्न विसकटून टाकतात आतली व्यवस्था, उघडं करतात दैन्य. रूढ समजुतींच्या पायाखालची आधारफळीच ओढून घेतात. कविता शब्दांकन करते अशा उखडलेल्या अवस्थांचं आणि आपल्याला आपल्यासमोर उभं करते!’
अशा स्व-आकलनाचं साधन झालेली आसावरी काकडे यांची कविता जसजशी खर्या ’मी’बद्दल बोलत जाते, तसतशी ती सार्वत्रिक आणि समकालीन होत जाते. अधिकाधिक सहज होत जाते...