Summary of the Book
आपले अस्तित्व हे एक गूढच आहे - त्याच्याच खोलात जाण्याचा हा आणखीन एक गूढ प्रयत्न. जन्ममृत्युच्या फेर्यात आपण अडकलेले आहोत, मिळालेले जीवन जास्तीतजास्त कसोशीने जगण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु मुळात हा फेरा सुरुच कसा झाला, विश्वाच्या पसार्यात तो फक्त पृथ्वीवरच आहे का आणि येथेच तो का व कसा, इतरत्र खरेच काय परिस्थिती आहे वगैरे वगैरे, जितका खोलवर विचार करत जाऊ तितके हे सारेच चक्रावून टाकत जाणारे आहे. भल्याभल्यांनी त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे; त्यातलाच हा एक प्रयत्न भक्कम शास्त्रीय आधार घेत केलेला न् म्हणूनच विचार करायला लावणारा हे सारे जितके मनोरंजक आहे तितकेच थरारकही म्हणूनच वरवर क्लिष्ट वाटणारा हा विषय प्रत्यक्षात तसा कष्टी करत नाही ह्याचे श्रेय काही प्रमाणात लेखक व्यक्तींनाही आहे त्यांनी हा विषय सुलभतेने मांडणेच पसंत केले आहे.