Summary of the Book
'अर्जुना,त्यांचे असणारे संकुचित अनुभवविश्व आणि त्यानुरूप असणाऱ्या त्यांच्या मर्यादित आशा आणि आकांक्षा या प्रमाणेच लोक मर्यादित देवतांचीच उपासना करतात.वस्तुतःया देवतांवर असणाऱ्या या लोकांच्या विश्वासाचा जन्म हा माझ्यातूनच उगम पावतो; इतकेच नव्हे तर, त्यांचा हा विश्वास माझ्यामुळेच सार्थही ठरत आसतो.पृथ्वीवर राहणाऱ्या या लोकांच्या नानाविध विकारांनी नियंत्रित केल्या गेलेल्या आयुष्याला संयमाचे अवगुंठन घालतो तो मीच!
जो कुणी स्वतःभोवती असणारी ही तटबंदी फोडतो, तो माझा शोध घेण्यात यशस्वी होतो कारण मी असीम आहे. मला कुठल्याही मर्यादा नाहीत.'