Summary of the Book
माणूस आयुष्यात जे अनुभव घेतो,
ते कधीकधी इतरांबरोबर वाटून घ्यावेसे वाटतात, इतरांना सांगावेसे वाटतात.
त्यात अगदी बालपणापासूनच्या आठवणी असतात. अशा काही आठवणी अरुण खोपकर यांनी 'चित्रव्यूह'
मधून वाचकांना सांगितल्या आहेत. बालपणातील मामा वरेरकर यांची आठवण, शाळा, रेडिओवरील काम,
विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा सहवास,संस्था, शहरे यांच्या विषयीच्या आठवणी यात आहे.
त्यांच्या लाडक्या 'किश्को' मांजरीवरील लेख वाचून मन हेलावून जाते.