Summary of the Book
भारतातील पश्चिमेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. त्यातील ‘कोकण’ हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रदेश आहे. फेसाळणारा सागर, नारळ, आंबा, काजू आदी फळांच्या बागा, जलदुर्ग हे कोकणचे वैभव आहे. प्राचीन काळात ‘अपरान्त’ म्हणजे पश्चिम दिशेला अंत होत असलेला भूभाग म्हणजे कोकणची ओळख आली आहे. या भागाच्या अतिप्राचीन इतिहासाचा मागोवा अण्णा शिरगावकर यांनी घेतला आहे. तेथील खेडीपाडी, डोंगरदर्या त्यांनी पालथ्या घातल्या आहेत. ताम्रपट, शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, अडीच हजार वर्षांपासून प्रचलित असलेली नाणी यांचा संग्रह त्यांनी केला. तेथील लेणी, गुहा प्रकाशात आणल्या. परशुरामाच्या या भूमीचा इतिहास, त्याचे संदर्भ, तेथील गड, बंदरे, वाहतुकीची साधने याची माहिती त्यांनी ‘शोध अपरान्ताचा’मध्ये दिली आहे. कोकणचा हा इतिहास सर्वांनी समजून घेतला पाहिजे.निसर्गरम्य कोकणचा, परशुरामभूमीचा शोध लेखक अण्णा शिरगावकर यांनी घेतला आहे.
कोकणाला प्राचीन इतिहास आहे. आणि इतिहासाविषयीच्या आदरातूनम,
आकर्षणातून आणि प्रेमातून घेतलेला हा विविधांगी शोध आहे. दरऱ्याखोऱ्यांतून,
खेड्यापाड्यातून हिंडून त्यांनी कोकणचा कानाकोपरा पहिला. या प्रवासातच त्यांनी चालुक्यांचे, शिलाहारांचे, त्रैकुटकांचेताम्रपट जमविले. मुघल, आदिलशाही, बहमनी, निजामशाही, डच, पोर्तुगीज, विजयनगरचे होन, अशी सुमारे साडेचार हजार नाणी जमवली.
अनेक हस्तलिखिते, पोथ्या, भूर्जपत्रे, दगडी मूर्ती, शिंपले, तलवारी, जांबिये, दांडपट्टे,
भांडी आदी नाना वस्तूंचा संग्रह केला.आणि हा सगळा इतिहास त्यांनी पुस्तकबद्ध केला.
शिवकालीन शिलालेख, विक्रमादित्याचा ताम्रपट, विजयनगर साम्राज्यातील मराठीतील पहिला शिलालेख आदी दुर्मिळ दाखले पुस्तकात वाचायला मिळतात..