Summary of the Book
नरेंद्र लांजेवार हे प्रयोगशील ग्रंथपाल, पत्रकार म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्यांच्या ग्रंथ व वाचनसंस्कृतीच्या सर्व ज्ञात-प्रसार कार्यासोबतच त्यांचे सामाजिक चळवळीतील कार्य आणि योगदानही सुपरिचित आहे. त्यांचे समाजोन्नतीला बांधील असणारे स्तंभ आणि ग्रंथलेखनही सर्वपरिचित असे आहे.
नरेंद्र लांजेवार यांची सामाजिक, सांस्कृतिक कार्यातील बांधिलकी, कळकळ आणि तळमळ दुर्मीळ होत चाललेल्या आजच्या भोवतालच्या, परिसराचे आपल्या परिश्रमाने यथायोग्य संगोपन, संवेदनशीलतेने व नम्रपणे करीत आहेत. अशा कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला आज गरज आहे.
नरेंद्र लांजेवार यांची; अभिव्यक्तीची स्पंदने, एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा, शिक्षणावर बोलू काही, साल-उकल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या : चिंतन आणि उपाय, वाचनसंस्कृती : आक्षेप आणि अपेक्षा, इ. महत्वपूर्ण ग्रंथसंपदेत 'प्रश्न आणि प्रश्नचिन्ह?' हा मोलाची भर टाकणारा नवा लेखसंग्रह त्यांच्या वैचारिक विविधतेची साक्ष देणारा ग्रंथ आहे. त्यांचे हे लेखन समाजमनाची व राष्ट्राची बांधणी करण्यासाठीची पायाभूत महत्वाची साधनसामुग्री आहे.