Summary of the Book
संत तुकाराम महाराज यांचे जीवन, कार्य आणि विचारांवर या पुस्तकाने प्रकाश टाकला आहे. तुकाराम महाराजांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी पुस्तकातील ४२ लेखांमधून स्पष्ट होते. पुस्तकाच्या प्रारंभी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्ध ते तुकोबा या प्रवासाचा मागोवा घेतला आहे. तुकारामांची धर्म संकल्पना, सामाजिक संघर्ष त्यांचा अद्वैतवाद, त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन आदी अंगाने त्यांच्या जीवनाचा वेध घेतला आहे.
याशिवाय लोकसाहित्त्यातील तुकाराम, तुकारामांचे अभंग, त्यांनी केलेली राष्ट्रजागृती, तुकारामांचे अभंग, तुकारामांचे विदेशी अभ्यासक अशी वेगळी माहिती वाचायला मिळते. डॉ. यू. म. पठाण, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. उषा मोडक, डॉ. अशोक कामत आदींनी पुस्तकासाठी लेखन केले आहे.