Summary of the Book
संगणक आपल्या जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. अगदी शिशू वर्गातील मुलांनाही संगणकाची ओळख करून देण्यात येते. म्हणजे तेव्हापासून संगणक हाताळण्यास सुरवात होते. पण संगणकाच्या अतिवापरामुळे शारीरिक व्याधी, आजार होत असल्याचे प्रमाणही वाढले आहे.
याची माहिती व उपाय डॉ. मंदार राजाराम जोशी यांनी संगणक युगातील आरोग्य'मधून सांगितले आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते, त्यांची मानसिक स्थिती, यावर या प्रकाश टाकला आहे. संगणकासमोरील बैठक कशी असावी, तो वापरताना काय काळजी घ्यावी, लहान मुलांची बैठक कशी असावी, माउस कसा वापरावा, प्रकाशरचना कशी असावी, संगणकामुळे होणारे डोळ्यांचे आजार, शारीरिक आजार, अप्रत्यक्ष होणारे आणि संभाव्य आजारांबद्दल व होमिओपॅथी उपचारपद्धतीबद्दल सविस्तर माहीती दिली आहे.
डोळ्यांचे आजार व संगणक, मणक्याचे आजार, कमरेचे दुखणे, हाताचे आजार व उपचार, मनगटाचे दुखणे, पायांचे आजार, अन्य शारीरिक ताण आदी आजारांची लक्षणे, कारणे, व्यायाम, होमिओपॅथीची औषधे, आहाराचे नियोजन, योगासनांचे फायदे सांगितले आहेत.