Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
उपासना माणसाला बळ देते. त्यामुळे त्याच्या प्रयत्नांना यश मिळण्याचा विश्वास त्याला वाटत असतो. कोणत्या दैवताची उपासना करावी, हे उपासकाने ठरवायचे असते. महादेवी या उपास्य देवतेची भक्ती अनेकजण करतात.
यासाठी सप्तशतीची पोथी किंवा श्रीसूक्तचा पाठ केला जातो. उपासना करताना सप्तशतीच्या किंवा श्रीसुक्तांच्या संहितेतील भाव जाणून घेणे आवश्यक ठरते. या दोन्हीत जीवनोपयोगी मानसशास्त्र सांगितले आहे. सामाजिक जाणं कशी जोपासावी हे सांगितले आहे. म्हणूनचं सप्तशती आणि श्रीसूक्त यांचा अभ्यास कसा करावा, हे कृ. भा. परांजपे यांनी 'महादेवी महात्म्य'मध्ये सांगितले आहे.
महादेवीची उपासना का करायची, याचे स्पष्टीकरण अनेक उदाहरणांसह प्रथम दिले आहे. मन प्रगल्भ व संस्कारित वृत्ती करण्यासाठी ही उपासना करायची आहे, हे लक्षात घेऊन उपासनेचा संकल्प, पूर्वतयारी कशी करायची, हे सांगताना दुर्गेच्या रूपांची माहिती दिली आहे.
माणसाच्या वृत्ती, वागणुकीनुसार कथा सांगून समाजातील व्यंग दाखवून त्यासाठी उपासनेचा मार्ग दाखविला आहे. महादेवीची स्तुती व उपासना पद्धती, श्रीसूक्तातील महादेवीची उपासना, दुर्गा सप्तशतीची फलश्रुती सांगितली आहे.