Hard Copy Price:
10% OFF R 120R 108
/ $
1.38
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
वर्षाला दहा कोटी रुपयांचा संगणकाचा व्यवसाय करणार्या पंकज करुलकरांचा हा तिसरा कथासंग्रह. त्यांच्या ‘डायरी’ कथासंग्रहाला राज्य पुरस्कार व श्री. दा. पानवलकर पुरस्कार मिळाले. मराठीत कसदार व उत्कृष्ट कथालेखन केले जात नाही ह्या विधानाला छेद देणारे त्यांचे लेखन आहे.
मुंबईसारखे महानगर हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय. साधी व सरळ अर्थवाही भाषा, त्यामधून येणारा समृद्ध आशाय, आयुष्याबद्दलची खोल जाणीव ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. मराठी लेखक शब्दांमध्ये, भाषेमध्ये अडकतात. कुरुलकरांचे लेखन त्याला अपवाद. ते तुम्हाला विलक्षण अस्वस्थ करते, त्रास देते. त्यांचा आशय अंगावर येतो आणि श्वास गुदमरून टाकतो. पहिल्या वाक्यापासून त्यांची कथा घेरून टाकते. कुठल्याही स्तरातील माणसाबद्दल ते सहजपणे लिहितात ह्याचे कारण मुंबई त्यांनी फार जवळून बघितली आहे. आयुष्यभरात एखादी गल्ली समजली तरी पुरे असे त्यांना स्वत:ला वाटते. त्यांचे लेखन बघता त्यांना मुंबई शहराची दाहक जाणीव आहे ह्याची खात्री पटते. ते कुठल्याही ‘ईझम’चा झेंडा बाळगत नाहीत, माणसाकडे अगदी स्वच्छपणे बघतात. ते वाचकाचे प्रबोधन करत नाहीत, मास्तरकी करत नाहीत. त्यांच्या व्यवसायामुळेही त्यांच्या लेखनात विलक्षण मोकळेपणा आला असेल.
आयुष्याबद्दलची वैश्र्विक जाणीव समृद्ध करणार्या ह्या सात दीर्घकथा !