Summary of the Book
विजय देवधर यांचा हा साहसकथांचा संग्रह. एकूण 14 कथा यामध्ये आहेत. केवळ मनोरंजन हा उद्देश या कथांमध्ये नाही; धैर्य, परोपकार आदी गुण या कथांमधून रुजावेत, असे कथेतील वातावरण आहे. अफाट धाडस आणि उदात्त माणुसकीचा अनुभव यातील कथांमध्ये येतो; तसेच पूर्व बर्लिनमधून पळून जाण्यासाठी एक जर्मन दांपत्य कशा युक्त्या लढविते, याची अद्भुत अशी कहाणी यामध्ये आहे.