Summary of the Book
जैवविविधता, भारतीय जंगले, जमिनींचे प्रश्न, वन्य जीवन, हवामान बदल अशा विविध विषयांची माहिती देणारे हे पुस्तक आहे.
देशभरात झालेल्या पर्यावरणविषयक चळवळी, जंगले वाचविण्यासाठी महिलांनी केलेल्या कामांवर "स्त्रिया आणि पर्यावरण', तसेच पर्यावरणविषयक कायदे, धोरणे आणि शासकीय नियम या बरोबरच पर्यावरणविषयक बातम्यांचे वार्तांकन याबद्दल शिंत्रे यांनी विस्ताराने लिहिले आहे. जंगलांविषयीची विविध दुर्मिळ छायाचित्रे, नकाशे आणि इन्फोग्राफिक्समुळे जंगल समजून घेणे अधिक रंजक होते. निसर्ग-पर्यावरणविषयक शब्दकोशही पुस्तकात आहे.