Summary of the Book
भागवत पुराण हे अठरा पुराणांपैकी सर्वात लोकप्रिय पुराण आहे. अठरा पुराणांपैकी दहा शिवविषयक, चार विष्णुविषयक, दोन ब्रह्माविषयक, एक अग्निविषयक आणि एक सूर्यविषयक अशी आहेत. त्यांपैकी भागवत पुराण, विष्णुपुराण, मत्स्य-पुराण आणि वायुपुराण ही अधिक प्राचीन आहेत. भागवतातील भक्तांच्या कथा अतिशय रंजक आणि बोधप्रद आहेत. ध्रुव, प्रल्हाद, अजामीळ, सुदामा यांच्या कथा पुन:पुन: वाचण्यासारख्या आहेत. या कथा रंजक तर आहेतच शिवाय त्या ईश्वरभक्तीचे माहात्म्य वाचकांचा मनावर बिंबवितात. भागवतातील सर्व कथा भक्तिप्रद असल्या तरी त्या कथांतील विविधतेमुळे भागवत हा ग्रंथ आकर्षक झाला आहे. अत्यंत प्राचीन काळापासून लोकांत रूढ असलेल्या भक्तांच्या श्रेष्ठ कथांचा संग्रह भागवताने केला आहे.