Summary of the Book
नीला सत्यनारायण, शर्वरी गोखले, मीरा बोरवणकर, मनीषा पाटणकर-म्हैसकर, संपदा मेहता, मेधा गाडगीळ ही नावं आपल्या परिचयाची आहेत. प्रशासकीय सेवेत धडाडीनं काम करणाऱ्या या महिला. या आणि त्यांच्यासारख्याच कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. हे पुस्तक दोन भागांत आहे. पहिल्या भागात १३ आयएएस, आयपीएस महिलांच्या मुलाखातींचा समावेश आहे. दुसऱ्या भागात २००८ नंतर लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या नऊ विद्यार्थिनींची परीक्षाविषयक मनोगते आहेत. अशा सेवेत जाण्यासाठी आव्हानांसंबंधीची माहिती पुस्तकात मिळते. त्यामुळेच हे पुस्तक संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतं