Summary of the Book
लेखक जयराज साळगावकर यांचे हे अतिशय वेगळ्या विषयावरील पुस्तक. माहीती तंत्रज्ञान हा विषय, मात्र तो भौतिक प्रगतीच्या इतिहासातून अवतरला आहे. अशा पद्धतीचा समग्र आढावा घेणारे पुस्तक मराठीत क्वचितच असेल.
एकूण १४ भागांतून हा विषय समोर येतो भाषेच्या उत्क्रांतीपासून त्याचं प्रारंभ होतो. कागद आणी छपाई, छपाई तंत्रज्ञानाचा प्रभाव, बदलांचा कालखंड आणि नागरी उठाव, ब्रिटीश साम्राज्य या विभांगातून ते इतिहासाचा मागोवा घेतात. त्यानंतर कॅमरासह अनेक यंत्रांची निर्मिती, दळणवळणातील वैज्ञानिक प्रगतीचा आलेख मांडला आहे.