Summary of the Book
सेलिब्रिटी विवाहांवर लेहिलेले हे पुस्तक. वेगळ्या जातीच्या, धर्माच्या व्यक्ती आधी प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधल्या जातात आणी त्यानंतर लग्नाच्या गाठीने. यांची भेट कशी झाली. त्यांनी विवाहाचा निर्णय कसा घेतला आणि तो कसा योग्य ठरला, याबद्दल किशोर धारगळकर माहिती देतात. दोन भिन्न संस्कृतींमधून आलेल्या जोडप्यांच्या मुलाखतींचा हा संग्रह आहे. भाग्यश्री पटवर्धन, पुष्कर श्रोत्री, आशुतोष राणा, किरीट सोमय्या, पल्लवी जोशी, अमोल गुप्ते,किरण करमरकर, तबस्सुम, किशोरी शहाणे, शिल्पा तुळसकर, पद्मिनी कोल्हापुरे, ईशिता अरुण, सलीम खान, जान्हवी पणशीकर, राज बब्बर, तौफिक कुरेशी, राम कपूर, अजित आगरकर, संदीप सोपारकर, शंकर महादेवन, इस्माइल दरबार या सिनेमा, नाटक, संगीत, क्रिकेट अशा क्षेत्रांतील सेलिब्रिटींचे जोडीदार आणि विवाह याची माहिती पुस्तकांतील छोटेखानी लेखांतून वाचायला मिळते.