Summary of the Book
सकाळी निसर्गाचे निरीक्षण करणं माला आवडतं. कोवळ्या अर्भकाला अंघोळ घातल्यावर तेजाचा त्याच्यावर साज चढतो ना! तसा पहाटेचा निसर्ग दिसतो.
स्टँडवरून घराकडे येण्यासाठी माघारी वळलो. शेऊरवाडीला लागून अनेक लोकांनी तळ दिले होते. प्लॅस्टिकच्या कागदाने किंवा साध्या कापडाची ताणलेली पाले दिसत होती. भंगारवाले. ज्योतिषवाले, गारुडी, बहुरूपी, घडशी, रद्दीवाले कितीतरी प्रकारचे लोक पावसाळा गेला की येतात आणि पाऊस सुरु होण्यापूर्वी परत नाहीसे होतात. वर्षानुवर्षे त्यांना मी पाहत आलेलो आहे.